करंजाडेत एकता डेंटल क्लीनिकचे उदघाटन ; अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे बी.जी.शेखर-पाटील यांची उपस्थिती...
पनवेल, दि.१९ (वार्ताहर)- पनवेल परिसरातील करंजाडे येथे दुधे विटेवरी या इमारतीमध्ये नव्याने सुरु करण्यात आलेल्या डॉ. रिना एकनाथ दुधे यांच्या एकता डेंटल क्लीनिकचे उदघाटन शुक्रवारी ता.18 रोजी सायंकाळी नवी मुंबई अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे बी.जी.शेखर-पाटील यांच्या हस्ते या क्लीनिकचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी एकनाथ दुधे उद्योजक, तुकाराम दुधे उद्योजक, माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी रावसाहेब शिंदे, विकी दुधे यांच्यासह पोलीस अधिकारी, बिल्डर, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. यावेळी कोरोना काळातील कसोटीच्या काळात एकता डेंटल क्लीनिक या नव्या सुरु झालेल्या क्लीनिकचे कौतुक केले. या क्लीनिकच्या माध्यमातून सामान्य लोकांना लाभ होणार असल्यामुळे अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) बी.जी.शेखर-पाटील यांनी समाधान व्यक्त करीत एकता डेंटल क्लीनिकच्या डॉ. रिना दुधे यांना शुभेच्छा दिल्या.
    

फोटो- डेंटल क्लिनिकचे उद्घाटन करताना
Comments