फी न भरल्यास ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवू नये ; गट शिक्षणाधिकार्‍यांचे शाळांना पत्र.....

तक्रार आल्यास चौकशी करून कारवाईचे आदेश....

पनवेल,(प्रतिनिधी) -- पनवेल परिसरात करोना संसर्ग सुरू असतांना, शैक्षणिक वर्षे कधी सुरू होईल याची खात्री नसतांना काही शाळांच्या व्यवस्थापनाकडून पालकांकडून आगामी शैक्षणिक वर्षासाठी ‘फी’ चा तगादा लावण्यात येत आहे. तर काही ठिकाणी नव्याने ‘फी’ वाढ प्रस्तावित आहे. अशा सर्व शाळा व्यवस्थापनाविरोधात तक्रार येताच चौकशी करून करवाईचे आदेश पनवेलचे गटशिक्षणाधिकारी प्रियांका पाटील यांनी पनवेल परिसरातील खाजगी शाळा मुख्याध्यापक यांना पत्र काढले आहेत.

कोरोनामुळे अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अनेकांचे उद्योगधंदे बंद पडले आहेत. त्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लगत आहे. अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही शैक्षणिक संस्थेनी फी वाढ करू नये, तसेच पालकांनी त्यांना शक्य होईल तशी टप्प्याटप्प्याने फी भरावी, असे शासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र असे असतानाही फी भरू न शकल्याने पनवेल तालुक्यातील अनेक शाळांनी मुलांचे ऑनलाईन शिक्षण बंद करून त्यांना शिक्षणा पासून वंचित ठेवले आहे. अनेक शाळा पालकांच्या विनंतीला न जुमानता अरेरावी पणे 100 टक्के फी ची मागणी करीत आहेत. जी मागणी महामारीच्या काळात अवास्तव आणि दुर्दैवी आहे.  त्यांनी कित्येक मुलांचे ऑनलाईन शिक्षण बंद करून त्यांचे शैक्षणिक नुकसान केले आहे आणि भारतीय संविधानाच्या शिक्षणाच्या अधिकाराचा अपमान केलेला आहे. अश्या शाळांनी त्वरित मुलांचे ऑनलाईन शिक्षण सुरू करावे आणि फीचा तगादा न लावता अवाजवी फी वसुली करू नये या करिता पालक संघटनेतर्फे पालक संघटनेचे अध्यक्ष वैभव महाडिक, उपाध्यक्ष अलपेश माने, सचिव, सारा मेमाणे, तुषार सावंत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस,पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष, स्वप्निल काटकर. युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, संग्राम देशमुख, साधना जी, योगेश पवार आणि इतर पालक यांनी पनवेल गटशिक्षणाधिकारी याची भेट घेतली होती, 
यावेळी प्रियांका पाटील यांना काहीं दिवसांपूर्वी निवेदन दिले होते. यावेळी पाटील यांनी तात्काळ याविषयाची गांभीर्याने दखल घेत पनवेल परिसरातील सर्व खाजगी शाळेच्या मुख्यध्यापकांना पत्र काढले यामध्ये पालकांकडून आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने कोणत्याही विध्यार्थ्याना फी न भरल्यामुळे ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवू नये, सर्व विद्यार्त्यांना तात्काळ ऑनलाईन शिक्षण सुरु करून विध्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत आवश्यकती काळजी घेण्यात यावी असे या पत्रामध्ये दिले आहे. मात्र या पत्रामुळे परिसरातील सर्व शाळांचे धाबे दणाणले आहेत. गटशिक्षणाधिकारी यांच्या निर्णयामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
Comments