१९ लाख रुपये किमतीचा गुटखा व तंबाखुजन्य पदार्थाचा साठा जप्त ,अन्न-औषध प्रशासनाची कारवाई ..


पनवेल दि.17 (वार्ताहर)-अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने सोमवारी उलवे सेक्टर-10 मधील शिवाजी नगर गावठाणातील दोन घरांवर छापा मारुन महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला तब्बल 19 लाख 11 हजार रुपये किंमतीचा गुटखा व तंबाखुजन्य पदार्थाचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी गुटख्याचा साठा बाळगणाऱया एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. 
        उलवे सेक्टर-10 मधील शिवाजी नगर गावठाणातील दोन घरांमध्ये मोठ्या  प्रमाणात प्रतिबंधित असलेला गुटखा व तंबाखुजन्य पदार्थाचा साठा लपवून ठेवण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन रायगड विभागाचे सह आयुक्त (दक्षता) समाधान पवार, तसेच दक्षता व गुफ्त वार्ता मुख्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी विशे, महाले, घोसलवाड, महिला अधिकारी येवले, तसेच अन्न सुरक्षा अधिकारी सचिन आढाव व त्यांच्या पथकाने उलवे शिवाजी नगर मधील संशयीत असलेल्या दोन्ही घरांवर छापा मारला. यावेळी दोन्ही घरांना टाळे असल्याचे आढळून आल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने सदर घरांचे टाळे तोडून दोन्ही घरांची तपासणी केली. या तपासणीत दोन्ही घरांमध्ये सुगंधित तंबाखुच्या 9 लाख 73 हजार रुपये किंमतीच्या 8 मोठÎा पिशव्या, रजनीगंधा पान मसाल्याचे 1 लाख 43 हजार रुपये किंमतीचे 74 बॉक्स, संजोग पान मसाल्याचे 2 लाख 82 हजार रुपये किंमतीच्या 47 गोण्या, राजनिवास सुगंधित पानमसाल्याचे 1 लाख 62 हजार रुपये किंमतीच्या 27 पिशव्या, विमल पान मसाल्याचे 3 लाख 16 हजार रुपये किंमतीच्या 32 पिशव्या, 17 हजार रुपये किंमतीचा एस-4 जर्दाच्या 10 पिशव्या, त्याचप्रमाणे 16 हजार 500 रुपये किंमतीचा एक्स एल-01 जाफरानी जर्दाच्या 11 पिशव्या असा एकुण 19 लाख 11 हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित असलेला पान मसाला व तंबाखुजन्य पदार्थाचा साठा करुन ठेवण्यात आल्याचे आढळुन आले. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने गुटखा व तंबाखुजन्य पदार्थाचा साठा करुन ठेवण्याबाबत आकाश चौरसिया याच्याकडे विचारणा केली असता, तो व राजु स्वामी हे दोघे गुटखा, पान मसाला व तंबाखुजन्य पदार्थाच्या पीचा व्यवसाय करत असल्याचे तसेच त्यांनी त्यासाठी दोन्ही घर भाडÎाने घेतल्याचे सांगितले. दरम्यान, सुगंधीत तंबाखू, सुगंधीत सुपारी, गुटखा, पानमसाला या सारख्या पदार्थाचे उत्पादन, साठा, वितरण, विक्री व वाहतुक करण्यावर महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली आहे. असे असताना, आकाश चौरसिया व राजु स्वामी यांनी गुटखा, पानमसाला व तंबाखुजन्य पदार्थाचा साठा करुन ठेवल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाने या दोघांविरोधात न्हावा शेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांनी साठा करुन ठेवण्यात आलेला गुटखा व तंबाखुजन्य पदार्थाचा साठा जप्त केला आहे.
Comments