ऑल महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार संघटनेच्या संघटक सचिव पदी प्रभुदास भोईर यांची नियुक्ती.....


डॅशिंग सामाजिक कार्यकर्ते प्रभुदास भोईर यांची कामगार क्षेत्रात दमदार एंट्री

ग्रामविकास आणि कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या शुभेच्छा

पनवेल  :-  ऑल महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार संघटनेच्या संघटक सचिव पदी डॅशिंग सामाजिक कार्यकर्ते प्रभुदास भोईर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या शुभहस्ते प्रभुदास भोईर उर्फ अण्णा यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले यावेळी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब बोरकर उपस्थित होते.
        शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत वाहतूक सेल चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष असणारे प्रभूदास भोईर यांचे संघटन कौशल्य नेत्रदीपक आहे. सामाजिक,राजकीय आणि सांस्कृतिक चळवळीत देखील त्यांचे अत्यंत मोलाचे योगदान राहिले आहे. पक्षाच्या माध्यमातून समाजातील तळागाळाच्या घटकाला न्याय देण्यासाठी, त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभुदास भोईर अक्षरशः दिवसाचे चोवीस तास उपलब्ध असतात. वाहतूकदार आणि वाहन चालक यांच्या कुशल संघटनेच्या माध्यमातून आज पर्यंत त्यांनी वाहतूक व परिवहन क्षेत्रात आपले आढळ स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेत ऑल महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब बोरकर यांनी प्रभुदास भोईर यांची संघटक सचिवपदी नियुक्ती करत असल्याचे पत्र प्रदान केले आहे. मंगळवार दिनांक 1 जून रोजी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि कामगार मंत्री सन्माननीय हसन मुश्रीफ यांनी हे नियुक्तीपत्र अध्यक्ष बाळासाहेब बोरकर यांच्या उपस्थितीत प्रभुदास भोईर यांना प्रदान केले.तसेच यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
          महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या आदेशानुसार तसेच नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस चे निरीक्षक प्रशांत पाटील यांच्या सूचनेनुसार ऑल महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार युनियन चे अध्यक्ष बाळासाहेब बोरकर यांनी प्रभुदास भोईर यांची संघटक सचिव महाराष्ट्र प्रदेश पदी नियुक्ती केली आहे.
          याबाबत प्रतिक्रिया देताना प्रभुदास भोईर म्हणाले की,  जरी कामगार क्षेत्रात मी नव्याने पदार्पण करत असलो तरी देखील शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून वाहतूक सेल निर्माण करणे व ती यशस्वीपणे चालविणे याचा मला प्रचंड अनुभव आहे. आज वाहतूकदारांच्या समस्यांचे निराकरण करत असताना चालक, क्लीनर या वर्गाला देखील आम्ही परिपूर्ण न्याय मिळवून दिला आहे. वाहतूक सेल मधील माझ्या कामाचा मला माथाडी आणि जनरल कामगार यांना न्याय मिळवून देण्यासाठी फायदा होणार आहे. आज एका मोठ्या संघटनेचे मोठे पद सांभाळत असताना माझ्यावरती जी जबाबदारी अध्यक्ष बाळासाहेब बोरकर यांनी टाकली आहे ती जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडेन याची मला खात्री आहे. सन्माननीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुभेच्छा दिल्यामुळे मला एक प्रकारचे बळ प्राप्त झाले आहे.
श्रमजीवी वर्गाला न्याय मिळून देण्यासाठी किंवा त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रभुदास भोईर या पद्धतीने पाठपुरावा करतात तो निश्चितच वाखाणण्याजोगा असतो.जिद्द,सचोटी ,आणि प्रामाणिकपणा या त्रिसूत्रीच्या जोरावरती आज पर्यंत प्रभुदास भोईर मार्गक्रमण करत आले आहेत.
माथाडी आणि जनरल कामगार वर्गात प्रभुदास भोईर यांच्या संघटक सचिवपदी नियुक्ती झाल्याने आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
Comments