पनवेल दि. ३० (वार्ताहर): यु.के. येथून भारतात पाठविलेल्या सामानाकरीता एअरपोर्ट क्लिअरन्स डिपार्टमेंट टॅक्स, जीएसटी, करन्सी कनव्हर्जन चार्जेस, डिलेव्हरी चार्जेस, इन्शुरंस, सिक्युरिटी रूम चार्जेस अशी वेगवेगळी कारणे सांगून लबाडीच्या इराद्याने पनवेलमधील एका व्यक्तीच्या वेगवेगळ्या बँक अकाऊंटमधून जवळपास 57 लाखांची रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर कऱण्यास भाग पाडून फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
प्रिंटा कुमारी (वय-32) यांना आलेल्या फोनवरून अद्विक कुमार बोलत असल्याचे सांगून कारगो डिपार्टमेंट दिल्ली येथून बोलणारे अनोळखी इसम यांनी त्यांना अद्विक कुमार याने यु.के. येथून भारतात पाठविलेल्या सामानाकरीता एअरपोर्ट क्लिअरन्स डिपार्टमेंट टॅक्स, जीएसटी, करन्सी कनव्हर्जन चार्जेस, डिलेव्हरी चार्जेस, इन्शुरंस, सिक्युरिटी रूम चार्जेस अशी वेगवेगळी कारणे सांगून लबाडीच्या इराद्याने त्यांच्या वेगवेगळ्या बँक अकाऊंटमधून जवळपास 57 लाखांची रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर कऱण्यास भाग पाडून फसवणुक केल्याची घटना घडल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.