साई परिवार संस्थेतर्फे अन्न - धान्य व फळांचे गरजूंना वाटप...
पनवेल वैभव :- मुंबई स्थित साई परिवार द्वारा आयोजित नित्य आहार दान उपक्रमाचा नुकताच एक मास पूर्ण झाला. द्वितीय टाळेबंदीच्या एक महिन्याच्या कालखंडात साई परिवार संस्थेद्वारा वरण-भात-भाजी-पोळी आमटी कोशिंबीर या समवेत फळ आणि आमरस यांचे देखील वितरण करण्यात आले. चारकोप गाव स्थित कोळी वाड्यातून दोनशेहून अधिक गरजवंतांना सदर आहार वितरित करण्यात आला. वैश्विक आपत्तीमध्ये शासन द्वारा संचालित सर्व नियमांचे पालन करीत विविध क्षेत्रातील समाजकार्यातील अग्रेसर व्यक्ती द्वारा गरजवंतांना नियमितपणे आहार दान करण्यात येते. पोस्ट खात्यातून निवृत्त श्री रासम व त्यांच्या पत्नी मनीषा रासम यांच्या समवेत ग्लॅडी डिसूजा, अंकुश रासम,अभिषेक सामंत, सोनाली सामंत, कुमार घरत इत्यादी द्वारा नियमितपणे गरजवंतांना आहार दान करण्यात येत असून कोळीवाड्यातील लहान बालके ते वृद्धांपर्यंत सर्वांना हा आहार दानाचा लाभ यशस्वीपणे प्राप्त व्हावा याची साई परिवारातील इतर सर्व सदस्य देखरेख करीत असतात. स्वप्नील वाडेकर मंगेश रासम आदी मान्यवर कालच्या प्रसंगी विशेष उपस्थित होते.
Comments