लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्याची जामीनावर सुटका.....
लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्याची जामीनावर सुटका.....

पनवेल,(प्रतिनिधी) -- घरपट्टी व अ‍ॅसेसमेंट उतारे देण्यासाठी 95 हजारांची लाच घेणार्‍या ग्रामसेवकासह एका कर्मचार्‍याला नवीमुंबई लाचलुचपत प्रतिबंधकाच्या पथकाने अटक केली होती. याबाबत गुरुवारी सायंकाळी जमीन मंजूर केला असल्याने त्यांची सुटका झाली आहे.
 
नुकतेच एका घरमालकाला घरपट्टी आणि अ‍ॅसेसमेंटचे उतारे पाहीजे होते. यासाठी त्यांनी वडघर ग्रामपंचायत येथे कार्यरत असणारे ग्रामविकास अधिकारी दगडू देवरे यांच्याशी संपर्क केला असता त्याने 1 लाख रुपयाच्या लाचेची मागणी केली. 95 हजारावर तडजोड झाली. ठरल्यानुसार सोमवार ता. 21 जुन रोजी दुपारी पनवेल एसटी स्टॅण्डच्या मागे इच्छापूर्ती गणेश मंदिरासमोरील रस्त्यावर ब्रिझा गाडीमध्ये तक्रारदाराकडून 95 हजाराची लाच स्विकारताना देवरे आणि दिवाबत्ती व पाणी पुरवठा कर्मचारी या दोघांना अ‍ॅन्टी करप्शन पथकाने ताब्यात घेतले होते. याबाबत गुरुवारी पनवेल न्यायालयात हजर केले असता न्यायालयात जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे त्यांची सुटका झाली आहे.
Comments