पनवेल तालुका पोलिसांनी केली विनाकारण विनामास्क फिरणार्‍यांवर कारवाई...


पनवेल, दि.३ (संजय कदम) ः कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर पनवेल तालुका पोलिसांनी विनाकारण विनामास्क फिरणार्‍यांवर कारवाई केली आहे.
पनवेल जवळील नेरे चौकी या परिसरात अ‍ॅमेझ होंडा या गाडीतून फिरणारे राजेंद्र चव्हाण, सुभाष चव्हाण, हनुमान गायकर यांच्याविरुद्ध कोव्हीड 19 या रोगाचा प्रादुर्भाव असल्याचे माहित असून देखील विनाकारण विनामास्क कोरोना या विषाणूचा संसर्ग होवून साथ पसरण्याची शक्यता असताना सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही उपाय योजना न करता शासनाचे संचारबंदीचे आादेश असताना देखील विनाकारण सार्वजनिक ठिकाणी विनामास्क चारचाकी वाहनात प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी फिरत असल्याचे आढळल्याने त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
Comments