पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी गणेश देशमुख यांची नियुक्ती....
पनवेल, दि. २९ (वार्ताहर) ः पनवेल महानगरपालिका आयुक्तपदी गणेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त सुधाकर देशमुख यांची भिवंडी-निजामपूर महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.
ठाणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी म्हणून कार्यरत असणारे गणेश देशमुख यांची महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 36 नुसार पनवेल महानगरपालिका आयुक्त या पदावर प्रशासकीय कारणास्तव नेमणूक करण्यात आली आहे. तर तत्कालीन पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांची भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. साधारण एक वर्षापूर्वी गणेश देशमुख हे पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी कार्यरत होते. त्यानंतर त्यांची अचानकपणे ठाणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली करण्यात आली होती व त्यांच्या जागेवर सुधाकर देशमुख यांनी पदभार स्वीकारला होता. आज पुन्हा अचानक शासनाकडून बदल्यांचे सत्र सुरू होवून त्यामध्ये गणेश देशमुख यांची पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी वर्णी लावण्यात आली आहे.
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केला जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी यांचा विशेष सत्कार....
Image