उरण रानसई येथील खोंड्याची वाडी व बंगल्याची वाडी येथीलआदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप....

                                                  
पनवेल वैभव :- प्रत्येक माणसाच्या जीवनात जसा आनंद हा काही काळापुरता  क्षणभंगूर वेळेचा सोबती असतो. तसंच दुःख सुद्धा  चिरकाल टिकणारं नसतं फक्त त्या दुःखावर मात करत त्यातून सुद्धा आनंद कसा शोधता येईल याची कला अगवगत असणं खूप महत्वाचं आहे.                               
दोन वर्षा पूर्वी अश्याच एका हृदयपिळवटून टाकणाऱ्या घटनेत अपघातात आपला काळजाचा तुकडा हरपलेल्या त्या कुटुंबावर दुःखाचं आभाळ कोसळलं  पण त्या दुःखाला कुरवाळत न बसता त्यातून सावरत आपल्या लाडक्याच्या पवित्र स्मृतीतुन आठवणींचा सुगंध सदैव दरवळत राहावा म्हणून स्वर्गिय वैभव गजानन म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच पुण्यस्मरण व्हावं म्हणून जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल आणि  स्वर्गिय वैभव दादांच्या लाडक्या बहिणींच्यां औदार्यातुन व केअर ऑफ़ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर यांच्या पुढाकारातून आज उरण रानसई  येथील खोंड्याची वाडी आणि बंगल्याची वाडी येथील आदिवासी वाड्यांवर त्या गरीब गरजूवंत आदिवासी बांधवांना  "तांदूळ, मुगडाळ, गोडेतेल, साखर, गव्हाचं पिठं" अश्या जीवनावश्यक वस्तूं किराणा सामानाचं वाटप करण्यात आलं.
   
या सेवाभावी कार्याकरीता आज खास उपस्थित राहिले ते रायगडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या बुलंद,पहाडी जादुई आवाजाने रसिक श्रोत्यांच्यां मनाला भुरळ घालत मंत्रमुग्ध करणारे प्रख्यात निवेदक नितेश पंडित त्यांनी या कार्यक्रमात त्या आदिवासी बांधवांना संबोधित करताना  राजू मुंबईकर यांच्या बद्दल सांगताना  एक छान प्रसंग अधोरेखित केला कि या वाड्यांवस्तींवरील आदिवासी बांधवांच्या जीवनातील अंधाराला दूर करण्या करीता विजेच्या मिणमिणत्या दिव्याचा आज लक्ख प्रकाशात रूपांतरित करणारां हा दुवा आहे .                खरं तर अनेक सुखसोईचां वानवा असणार्या ह्या समाज्याला प्रकाशवाट दाखवत त्यांचा मार्ग सुखकर करणारा दोघांमधला दुवा आहेत.राजू मुंबईकर म्हणून हा आपल्या मधला दुवा कधी तोडू नका !तुम्हां आदिवासी बांधवांच्या भल्याकरीता झटणार्या ह्या जिवाच्या मित्राला कधी विसरू नका !
केअर ऑफ़ नेचर संस्थेच्या पुढाकाराने आणि  राजू मुंबईकारांच्यां सहकार्यानं साकार झालेल्या या आदर्शवत कार्यक्रमात कोरोना सारख्या महाभयंकर काळात थोड्या वेळच्या शिदोरी करीता का होईना पण संकट समयी मिळालेलं या जीवनावश्यक वस्तूं ,किराणा सामानानं त्या आदिवासी बांधवांच्यां चेहऱ्यावरचा तो ओसंडून वाहणारा आनंद पाहण्या जोगा होता.  
या प्रेरणादायी कार्यक्रमा करीता प्रमुख उपास्थिती दर्शविली ती सुप्रसिद्ध निवेदक  नितेश पंडित,  केअर ऑफ़ नेचर संस्थेचे अध्यक्ष स्नेहल पालकर, सेक्रेटरी विलास ठाकूर, गोल्डन ज्युबली मंडळाचे अध्यक्ष नवनीत जी पाटील , अनिल घरत, सारडे विकास मंचचे उपाध्यक्ष  संपेश पाटील, खजिनदार, रोशन पाटील, कांतीलाल म्हात्रे,  रानसईचे सामाजिक कार्यकरर्ते श्याम लेंडे आणि वाडीवरील सर्व आदिवासी बांधव आणि महिला भगिनींच्यां उपस्थित हा अनोखा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
Comments