रिक्षासह मोटारसायकलीची चोरी
पनवेल दि.17 (संजय कदम)- पनवेल परिसरातून रिक्षासह मोटारसायकलीची चोरी झाल्याची घटना घडल्याने वाहनचालकांमध्ये भीतीयुक्त वातावरण आहे.
शहरातील लाईन आळी येथील भवानी मोबाईल एस्केसरीजसमोर सुनिल पाटील यांनी त्यांची काळ्या पिवळ्या रंगाची ऑटोरिक्षा क्र.-एमएच46एझेड4890 ज्याची किंमत 45 हजार इतकी आहे. ही उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी सदर रिक्षा चोरून नेली आहे. तर दुसऱ्या घटनेत करंजाडे प्लॉट नं-03 मंगलमूर्ती कंस्ट्रक्शनच्या कार्यालयासमोर विजय दरेकर यांनी त्यांची 35 हजारांची काळ्या रंगाची होंडा कंपनीची सीबी युनिकॉर्न गाडी क्र- एमएच46एस9679 हि उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी सदर गाडीचोरून नेली आहे. याबाबतच्या तक्रारी पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आल्या आहेत.