खांदा कॉलनी / प्रतिनिधी :- शिवसेना शहर शाखा खांदा कॉलनी तर्फे ५५ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली. त्याच बरोबर भगवा ध्वजारोहण ही करण्यात आला तसेच महाराष्ट्राचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या अनुशंगाने सुरु करण्यात आलेला आदित्य जनसेवा सप्ताहाचा समारोप गोरगरीबांच्या वस्ती मध्ये अन्नदान करून करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना शिवसेना पनवेल महानगरप्रमुख यांनी शिवसेना हा पक्ष बाळासाहेबांनी कसा उभा केला याचे उदाहरण दिले ५५ वर्षे निष्ठेचे, विश्वासाचे आणि समजकारणाचे या बाळासाहेबांच्या विचारावर शिवसेना पक्ष हा भक्कम उभा आहे. या ५५ वर्षात शिवसेना हा पक्ष तळागाळात विणला गेला आहे. आणि या पुढेही हा पक्ष आणखी बळकाटीने उभा राहील असे बोलून शिवसैनिकांचे मनोबल वाढवले.
यावेळी खांदा कॉलनी शहर प्रमुख सदानंद शिर्के यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना येत्या महानगर पालिकेच्या निवडणुकीत खांदा कॉलनी मध्ये कोणत्याही परिस्तिथीत शिवसेनेचा भगवा फडकल्या शिवाय राहणार नाही हा विश्वास व्यक्त केला व वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख सदानंद शिर्के, उपशहर प्रमुख दत्तात्रेय महामुलकर, उपशहर प्रमुख संपत सुवर्णा, महिला आघाडी उप महानगर संघटिका संचिता राणे, शहर संघटक संतोष जाधव, उपविधानसभा अधिकारी सुशांत सावंत, उपशहर संघटक संजीव गमरे, उपशहर संघटक प्रकाश वानखेडे, युवती विधानसभा समन्वयक वृषाली तांदळे, विभाग संघटक श्रीहरी मिसाळ, उपविभाग प्रमुख जयराम खैरे, शहर चिटणीस सुयश बंडगर, युवती शहर अधिकारी सानिका लाडे व मोठ्या संख्येने शिवसैनिक, महिला आघाडी, युवासेना व युवती सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्तिथ होते.