महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांच्या जन्म दिवसाने जपली सामाजिक बांधिलकी ; गरजूंना दिला मदतीचा हात....
पनवेल दि.04 (वार्ताहर)- जन्मताच त्याचबरोबर अपघाताने काहींना अपंगत्व आले आहे. अशा खडतर आयुष्यातही स्वतःचा उदरनिर्वाह बहुतांशी विकलांग बांधव करतात. त्यांची जगण्याची उमेद थक्क करणारी असते. मात्र कोरोना या वैश्विक संकटामुळे त्यांच्या समोरही उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात टाळेबंदी मुळे आणखी अडचणी समोर आल्या या सर्व गोष्टींचा विचार करून शिवसेनेचे पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांनी अशा दिव्यांग बांधव आणि भगिनींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. त्याचबरोबर उघड्यावर राहणारे गरीब गरजू तसेच आदिवासी बांधवांना ही अन्नधान्याचे किट  देऊन सेना महानगरप्रमुखांनी आपली सामाजिक बांधिलकी जपली.          

काहींना जन्मताच अंधत्व किंवा शरीरातील एक दुसरा अवयव नसल्याने अपंगत्व येते, पोलिओमुळे सुद्धा कित्येक जण लहानपणी विकलांग झाले आहेत. तर काहींचे अपघाताने हात किंवा पाय निकामी झाल्याने ते सुद्धा विकलांग होतात. परंतु त्यावरही विजय मिळवत परिश्रम चिकाटी आणि जिद्दीने काही जण उभे राहतात. आपला व आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. तर काही अंध आणि पूर्ण विकलांगत्व आलेल्यांना त्यांना इतरांच्या मदतीवर अवलंबून राहावे लागते. किंवा भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करावा लागतो. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपलं जीवन व्यतीत करीत असताना गेल्या वर्षभरापासून कोरोना हे वैश्विक संकट संपूर्ण जगावर अधिराज्य गाजवीत आहे. सध्या या महामारीची दुसरी लाट सुरू  आहे. कोरोनाविषाणू चे संक्रमण होऊ नये या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने मध्यंतरीच्या काळामध्ये टाळेबंदी घोषित केली होती. त्यामुळे कोरोना  बऱ्याच अंशी नियंत्रणात आला आहे. त्याला पनवेल परिसर सुद्धा अपवाद नाही.  लाॅडाऊनमुळे अनेकांच्या हातांना काम मिळाले नाही. त्यामुळे अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बेताची झाली. धडधाकट असलेला कुटुंबप्रमुखकांवर आर्थिक विवंचनेचे संकट आले. असे असताना दिव्यांगांची काय परिस्थिती निर्माण झाली असेल याचा विचार केला तरी आपले मन सुन्न झाल्याशिवाय राहत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर पनवेल परिसरातील अशा गरजवंत दिव्यांगांचा शोध घेऊन शिवसेनेचे पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांनी त्यांना जीवनावश्यक मदत केली. गहू ,तांदूळ, कांदे ,बटाटे, साखर, तेल,तुरडाळ या वस्तूंची किट संबंधितांना देण्यात आले. बहुतांशी दिव्यांग बांधवांचा घरी जाऊन रामदास शेवाळे  प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी या वस्तू पोहोच केल्या.

यावेळी  प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत फाळके, तुकाराम सरक, महेश गोडसे, विशाल सपकाळ, अनिल  खेडकर, निलेश भगत, नितिन गुलदगड, रणजित फडतरे,सुभाष ढवळे, हणमंत पिसाळ, सचिन ढोले, गणेश गोडसे,प्रणित पाटील, विनय भोईर  उपस्थित होते. अंध व  दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तू वाटल्या केल्या बद्दल अपंग क्रांती संघटनेचे विलास फडके यांनी  रामदास शेवाळे यांचे आभार मानले.

चौकट 
वृद्धाश्रम व  फणसवाडीवरही जीवनावश्यक वस्तूंचे वाटप शिवसेनेचे पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त तळोजा येथील वृद्धाश्रमात ही जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. त्याचबरोबर खारघर जवळील फणसवाडी येथील आदिवासी कुटुंबियांना अन्नधान्य देण्यात आले. शांतीवन येथील अनाथाश्रमात साडेचारशे वह्या देऊन शेवळे यांनी  शिक्षणास हातभार लावला.
कोटकोरोनाच्या काळात परिस्थिती अत्यंत बिकट आहे. कित्येकांचे कुटुंब या आजाराने उध्वस्त झाली आहेत. अशा या महामारी मध्ये वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय मी घेतला. तसे आवाहन शिवसैनिक आणि इतर सहकाऱ्यांना केले. त्याचबरोबर वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत दिव्यांग आणि गोरगरिबांना जीवनावश्‍यक मदत करता आली याचा मनोमन आनंद आहे.
               
फोटोः वाढदिवस साजरा न करता गोरगरिबांना रामदास शेवाळे यांनी केले अन्नदान
Comments