बंद फ्लॅटमधील रोख रक्कम लंपास....
बंद फ्लॅटमधील रोख रक्कम केली लंपास

पनवेल दि.०४ (संजय कदम)- एका बंद फ्लॅटमधील ठेवलेली १,३८०००/-  ची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना करंजाडे वसाहतीत घडली आहे.
         
शमशुद्दिन अजमुद्दिन शेख यांचा करंजाडे से.-5 येथे एक फ्लॅट असून सदर फ्लॅटचे काम बाकी असल्याने गेल्या काही महिन्यांपासून तो बंद होता. त्या बंद फ्लॅटमध्ये एका विटकरी रंगाच्या बॅगेत त्यांनी १ लाख ३८ हजार ठेवले होते. परंतु कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या संमत्तीशिवाय लबाडीच्या इराद्याने सदर रोख रक्कम चोरून नेल्याची तक्रार त्यांनी पनवेल शहर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.
Comments