7 लाख रुपये किंमतीच्या मालाचा अपहार.....
7 लाख रुपये किंमतीच्या मालाचा अपहार

पनवेल, दि.14 (संजय कदम) ः 7 लाख रुपये किंमतीच्या मालाचा अपहार झाल्याची घटना तळोजा औद्योगिक वसाहतीमधील जी.राईडस् फन फॅक्टरीजमध्ये घडली आहे.
गौरव अग्रवाल यांनी त्यांच्या जी.राईटस् फन फॅक्टरीजमध्ये जॉईंन्ट व्हिल राईटस्, ब्रेक डान्स राईटस्, ट्रान्सफार्मर, एसी, मायक्रोओव्हव असा मिळून 7,10,000/- रुपये किंमतीचा माल ठेवला असता सदर कंपनीचे सुपर वायझर भरत मोटवानी यांनी सदर मालाचा अपहार केल्याची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यानुसार तळोजा पोलीस सदर आरोपीचा शोध घेत आहेत.
Comments