घरफोडी करणारा अट्टल आरोपी गुन्हे शाखा कक्ष 2 कडून जेरबंद .......
पनवेल, दि.11 (संजय कदम) ः कामोठे वसाहतीमध्ये घरफोडी केल्याप्रकरणी गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने सराईत गुन्हेगाराला गजाआड केले आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील कामोठे पोलीस ठाणे हद्दीमध्ये सेक्टर 13, कामोठे येथील आर्ट वॉच व फुड मॅजिक या दोन दुकानाचे शटर उचकटुन दुकानातील घड्याळे व रोख रक्कम चोरून नेल्याने कामोठे पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे कारागृहामध्ये होणारा संसर्ग टाळण्यासाठी मा न्यायालयाने जामिनावर मुक्त केलेल्या आरोपीच्या हालचालीवर लक्ष ठेवणेबाबत तसेच त्यांना वेळोवेळी चेक करणेबात पोलीस आयुक्त, बिपिनकुमार सिंह, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), डॉ.बी.जी .शेखर पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), प्रविण पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त ( गुन्हे), विनोद चव्हाण यांनी गुन्हे शाखेच्या सर्व शाखांना सूचना दिल्या होत्या. सदर गुन्हयांच्या समांतर तपासादरम्यान गुन्हे शाखा, कक्ष 02, पनवेल येथिल वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश कराड, सपोनि प्रविण फडतरे, पोउपनि वैभव रोगे, पोउपनि मानसिंग पाटील व पथक यांनी सदरचा गुन्हा घडलेल्या ठिकाणी वेळोवेळी भेट देवुन सदर ठिकाणचे तसेच आजुबाजुचे सीसीटिव्ही फुटेज तपासुन सदरचा गुन्हा करणारा आरोपी हा नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अभिलेखावरील तसेच कोरोना विषाणु संसर्ग टाळण्याच्या धर्तीवर मा . न्यायालयाने मुक्त केलेला आरोपी नामे मिथुन मोजलीस सिकददर , वय 26 वर्षे , धंदा- भंगार बेचने . रा . मोठा खांदा गाव , पनवेल , मुळ राठी - काशीपुर ज्योतीनगर कॉलनी , ता - बी . बाजार , जिल्हा - दक्षिण 24 परगणा , पं बंगाल याने केल्याचे निष्पन्न झाले . सदर आरोपीस ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने वेगवेगळी पथके तयार करून कामोठे , खांदेश्‍वर , पनवेल , खारघर परिसरामध्ये गुन्हा दाखल झाल्यापासुन सापळा लावुन त्यास खांदेश्‍वर सर्कस मैदान येथे ताब्यात घेतले . सदर आरोपीकडे सखोल तपास करून त्याचेकडुन गुन्ह्यातील गेलेला संपुर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . कोरोना विषाणुचा संसर्ग होत असल्याने कारागृहात होणारा संसर्ग टाळण्यासाठी मा न्यायालयाने सदर आरोपीस दि . 13/05/2021 रोजी जामिनावर मुक्त करण्यात आले होते. तळोजा कारागृहातुन बाहेर आल्यानंतर नमुद आरोपीने सदरचा गुन्हा केलेला आहे. नमुद आरोपीवर यापुर्वी चोरी व घरफोडीचे एकुण 07 गुन्हे दाखल आहेत . सदरच्या गुन्हयाच्या तपासादरम्यान सफौ.एस . पाटील, सफो एस.सांळुके , पोहवा पाटील , पोहवा  पाटकर , पोहवा गडगे , पोहवा पवार , पोहवा कुदळे , पोना पाटील , पोना कानु , पोना मोरे , पोना  फंदे , पोशि पाटील , यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.


फोटो ः घरफोडीतील मुद्देमालासह अधिकारी वर्ग
Comments