सिडको नागरी आरोग्य केंद्र कधी सुरू करणार ? चिंचपाडा परिसरातील ग्रामस्थांचा सवाल....

पनवेल, दि.२० (वार्ताहर) ः सिडको विकसित करीत असलेल्या चिंचपाडा, करंजाडे, पुष्पक नगर आदी परिसरातील नागरिकांसाठी भूखंड क्रं.134 सेक्टर आर-2, आर अ‍ॅण्ड आर पॉकेट नं.2 या ठिकाणी नागरी आरोग्य केंद्र उभारण्यात आले असून अद्यापही ते सुरू नसल्याने या वसाहतीत राहणार्‍या तसेच परिसरातील ग्रामस्थांनी सिडको विरोधात संताप व्यक्त केला आहे.
नागरिकांना चांगल्या सोयी सुविधा देण्यासाठी सिडकोने या ठिकाणी वसाहत निर्माण केली. परंतु सध्याच्या कोरोनाच्या काळात सिडकोने नागरी आरोग्य केंद्र सुरू करणे गरजेचे होते. सदर आरोग्य केंद्र हे 2018 साली उभारण्यात आले आहे. परंतु अद्याप येथे कुठल्याही प्रकारची सोयी सुविधा नसून ते कुलूप बंद अवस्थेत आहे. तरी या वाढत्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हे नागरी आरोग्य केंद्र लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत.


कोट
सिडकोला आम्ही भूखंड दिले. परंतु नागरी सोयी सुविधा देण्यास सिडको अपुरे पडत असून अधिकारी बदलतात. तसेच त्यांच्या कामाची पद्धत बदलते व त्याचा नाहक त्रास आम्हा ग्रामस्थांना होतो. 
शशिकांत केणी, चिंचपाडा गाव पंच
सिडको भूमीपुत्रांना वेठीस धरण्याचे काम करीत आहे. परंतु त्यांनी नागरी सोयी सुविधा न पुरविल्यास आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन करू.
समीर केणी, ग्रामस्थ


फोटो ः बंद असलेले नागरी सुविधा केंद्र
Comments