पनवेल (प्रतिनिधी) कोरोनाच्या महाभयानक आजाराने संपूर्ण जगाला भेडसावून सोडलेले आहे. कोरोनाच्या महामारीत अनेक जीवलगांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. उरण तालुक्यातील प्राथमिक शिक्षिका असलेल्या 1)सौ .कल्पना अरुण पाटील शाळा मुळेखंड .
2)सौ. ऊर्मिला रमेश म्हात्रे शाळा सारडे.
3) श्रीमती समता रामचंद्र ठाकूर, शाळा कोंढारी .
4)सौ.शारदा गजानन गायकवाड शाळा चिरले. या चार शिक्षक भगिनींनी आपणही ह्या सामाजाचं देणं लागतो या भावनेतून "एक हात मदतीचा*" ' या उपक्रमांतर्गत सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने 'नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय पनवेल' येथील कोव्हीड सेंटर मधील रुग्णांसाठी अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने या शिक्षक भगिनींनी फ्रिज आणि इंजेक्शन्सची मदत केली. दि.२०/०५/२०२१ रोजी फ्रिज आणि इंजेक्शन्स या चारही भगिनिंच्या वतीने पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक डॉ अरुणकुमार भगत यांनी नानासाहेब धर्माधिकारी रुग्णालयाचे डॉ. सचिन संकपाळ आणि डॉ फाळके यांच्याकडे सुपूर्द केली.
सौ .कल्पना अरुण पाटील शाळा मुळेखंड, सौ. ऊर्मिला रमेश म्हात्रे शाळा सारडे, श्रीमती समता रामचंद्र ठाकूर शाळा कोंढारी, सौ.शारदा गजानन गायकवाड शाळा चिरले या उरण तालुक्यातील शिक्षक भगिनींनी जे मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल नानासाहेब धर्माधिकारी रुग्णालयाचे डॉ सचिन संकपाळ यांनी आभार मानले.