पनवेल / वार्ताहर :- काल पासून सुरू असलेल्या वादळामुळे आणि जोरदार पावसामुळे प्रभागात काही ठिकाणी झाडं पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता. प्रभागातील नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून नगरसेवक विक्रांत पाटील यांनी त्वरीत पाऊले उचलत महानगरपालिका, अग्निशमन आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांशी बोलून जुना ठाणा नाका येथील नाल्याची साफाई, पडलेली झाडं कापून त्वरित उचलून घेणें तसेच विद्युत पुरवठा सुरळीत करून घेतला.
"माझा प्रभाग,माझी जवाबदारी" या अनुषंगाने नेहमीच प्रभागातील समस्या नगरसेवक विक्रांत पाटील तत्परतेने सोडवण्यास प्राधान्य देत असतात या बद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे