प्रत्येक समाजाने एकमेकांच्या सुखदुःखात सहभाग घेवून सौजन्याने वागणे गरजचे ; वपोनि रवींद्र दौंडकर

पनवेल, दि. २९ (संजय कदम) ः सर्वच समाजातील लोकांनी जातीय सलोखा वाढविण्याचा प्रयत्न करावा, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होवून एकमेकांशी सौजन्याने वागणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी त्यांच्या कार्यालयात प्रतिष्ठीत नागरिक, समाजसेवक, शांतता कमिटी सदस्य, मोहल्ला कमिटी सदस्य यांच्या घेतलेल्या एकत्रित बैठकीत मार्गदर्शन करताना केले.
यावेळी बोलताना रवींद्र दौंडकर यांनी सांगितले की, सर्व मोहल्ला कमिटी व शांतता कमिटीवर असणार्‍या सदस्यांनी गावातील प्रत्येक राजकीय, जातीय धार्मिक कार्यक्रम व चालू घडामोडीबाबत पोलीस ठाण्यात किंवा संबंधित भेट किंवा गोपनीय विभागाला तात्काळ माहिती कळविणे आवश्यक आहे. सर्व मोहल्ला कमिटी व शांतता कमिटीत असणार्‍या सदस्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाची किंवा धर्माची एकतर्फी बाजू घेवू नये, गावात तटस्थ भूमिका ठेवून सर्वधर्म समभाव या प्रकारे वागणूक ठेवावी, आपापल्या गावात असणारे हिंदू व मुस्लीम लोकांशी जातीय सलोखा वाढविण्याचा प्रयत्न करावा, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होवून त्यांच्याशी सौजन्याने वागावे. कोरोना महामारीवर घ्यावयाची दक्षता, उपाय योजना व वाढत्या गुन्हेगारी संदर्भात घ्यावयाची काळजी, तसेच संपूर्ण परिसर सीसीटीव्ही नियंत्रणाखाली आणण्याकामी उपस्थितांना त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. 
फोटो ः वपोनि रवींद्र दौंडकर मार्गदर्शन करताना.
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केला जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी यांचा विशेष सत्कार....
Image