बुद्ध पौर्णिमे निमित्त पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थेकडून खीर दान वाटप..
पनवेल  दि. २६ / संजय कदम :- आज २६ मे  जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती वैशाखी पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते, पंचशील बुद्ध विहार नवीन पनवेल या विहाराचे नुकतेच राहिवाश्याच्या सहभागातून सुशोभीकरण झाले असून बुद्ध पौर्णिमेच अवचित साधून लोकार्पण करणयात आले या कार्यक्रमाला पनवेलचे अनेक मान्यवर दिग्गज या विहारात वंदन करण्यासाठी आले. तसेच बौद्ध पौर्णिमेला खिरीचे खूप महत्व असते म्हणून पंचशील नगर सामाजिक संस्थेने या ठिकाणी खीर दान करून विहारात उपस्थित सर्व नागरिकांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
 
या खीर दानाच्या कार्यासाठी पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शंकर वायदंडे, उपाध्यक्ष अशोक आखाडे, खजिनदार भानुदास वाघमारे, सचिव राहुल पोपलवार , सहसचिव विनोद खंडागळे, संघटक कैलास नेमाडे, सल्लागार वकील रामभाऊ कांबळे, कमिटी सदस्य अजय दुबे,अमेय इंगोले,रामदास खरात ,हेमा रोड्रिंक्स संतोष जाधव वल्ली महमद शेख ,संतोष ढोबळे, संजय धोत्रे, हरीचंद बनकर, शोभा गवई, विनोद तायडे, आदी सह  दीपक खरात, दीपक लोंढे, विनोद इंगोले, अंकुश पाखरे, बंडू गाडगे,सागर चव्हाण, अनिल खिलारे अमोल गाडगे जितू घाटविसावे, संजय कंठाळे,संजय तायडे, जूम्मंनभाई, संजीव ठाकूर , मनोज ठाकूर आमन तायडे अविनाश पराड, करन बोराडे, गोपाल उबाळे,उमेश पलमाटे,अनिल वानखेडे धीरज नाईक, रोहित पवार, संतोष पाल, अमोल डाके,रोहित चव्हाण आदींन बरोबर महिला भगिनी पल्लवी आखाडे, रुपाली खंडागळे, अक्षदा कदम,सरस्वती वाकुडे, विजय मला कुशबा, शांतावा मस्के, पवित्र खंडागळे, आरती कुशबा, निकीती वाकुडे, आदी मेहनत घेत आहेत.
Comments