मंथन फाऊंडेशन व निरामय योग संशोधन प्रसार केंद्रातर्फे योग शिबिराचे आयोजन

पनवेल, दि.१० (वार्ताहर) ः जगामध्ये सर्वत्र कोरोनासाथीचा  प्रादुर्भाव दिवसेदिवस आलेख वाढत आहे,  त्यामुळे ठिकठिकाणी ऑक्सीजनचा तुटवडा, औषधांची कमतरता,  बेड पुरेसे उपलब्ध न होणे,  मृत्यूदर, विविध समस्या निर्माण होत आहे, यामुळे परिस्थिती गंभीर होत आहे, या मध्ये प्रामुख्याने श्‍वास आणि श्‍वसन त्रास मोठ्या प्रमाणात उद्भवतात आणि त्यावर मात करण्यासाठी आपल्याला ती शृंखला ब्रेक द चेन रोखायची असेल तर आपल्याला आपली मानसिक व शारीरिक, रोग प्रतिकार क्षमता वाढवणे, आपली रोगप्रतिकारक क्षमता आणि  फुप्फुसाची कार्यक्षमता वाढवणे खूप महत्वाचे आहे,  तुझ आहे तुझपाशी पण जागा चुकलाशी या उक्तीनुसार आपले संरक्षण काळजी आपल्यातच हातात आहे, तर त्याकरिता  प्राणायाम आणि योगा, आपली शारीरिक व मानसिक क्षमता वृध्दिंगत व्हावी , आणि  सामाजिक बांधीलकी म्हणून  मंथन फाउंडेशन व निरामय योग संशोधन व प्रसार केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने  15 मे ते 21 मे 2021 ऑनलाईन  सकाळी 7.00 ते 8 . 00 वाजता दरम्यान योग शिबिर आयोजित  करण्यात  आले आहे.
सध्या वर्तमान परिस्थितीचा विचार करून  सर्व नागरिकांनी योग शिबिरांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे,  तसेच अधिक माहिती आणि नोंदणी करिता  किरण जगन्नाथ वारे - 7066508026 आणि विजय साळुंखे  - 9221284444 यांना संपर्क  साधावा, आणि जास्तीत जास्त नागरिकांनी ऑनलाईन योग शिबिरात सहभागी व्हावे अशी विनंती करण्यात आली आहे.
Comments