कामोठे पोलिसांची फास्ट फुड दुकानावर कारवाई
कामोठे पोलिसांची फास्ट फुड दुकानावर कारवाई

पनवेल, दि.६ (वार्ताहर) ः शासनाच्या आदेशाप्रमाणे आस्थापनाविहित वेळेपेक्षा जास्त वेळ फास्ट फुड चालू ठेवल्याने कामोठे वसाहतीमध्ये दोन जणांविरोधात कामोठे पोलिसांनी कारवाई केली आहे.
विहान चायनीज फास्ट फुड तसेच अलबेक फास्ट फुड या दुकानाच्या चालकांनी शासनाच्या आदेशाप्रमाणे आस्थापना विहित वेळेपेक्षा जास्त वेळ चालू ठेवून केवळ होम डिलेव्हरी करण्याचे आदेश असतानाही त्यांच्या हॉटेल समोर ग्राहकांची गर्दी जमवून खाद्य पदार्थ विक्री करून पनवेल महानगरपालिका तसेच शासनाच्या नियमांच्या आदेशाचे अवहेलना केल्याबद्दल अतुल बोडवे व संदीप लाखन यांच्या विरोधात भादवी कलम 188, 270 सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 (ब) सह महाराष्ट्र कोव्हीड-19 उपाय योजना सन 2020 चे कलम 11 व साथरोग प्रतिबंध कायदा 1897 कलम 03 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
Comments