खांदा कॉलनी / प्रतिनिधी :- खांदा कॉलनीतील बुद्धविहारात तथागत गौतम बुद्धाची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी सर्वप्रथम बौद्ध उपासिका सरला शरद जाधव यांच्या शुभहस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच निर्मला तायडे यांच्या हस्ते तथागताला पुष्प अर्पण करण्यात आले.
तसेच प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन चंद्रसेन कांबळे यांनी केले, ते म्हणाले की प्रत्येक प्रत्येक बौद्ध उपासकाने पंचशील व 22 प्रतिज्ञाचे पालन करावे प्रत्येक रविवारी न विसरता सर्वांनी बुद्ध विहारात येण्याची कृपा करावी त्यातून आपल्याला धम्माचे ज्ञान मिळते असे सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिनेश जाधव होते सामुदायिक वंदना भारतीय बौद्ध महासभा यांनी घेतली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डी.जे जाधव, विश्वास भालेराव, शामराव तोरणे, राजू इंगळे यांनी मेहनत घेतली, त्याचप्रमाणे भगवान कदम अंकुश वाघमारे ,राजेंद्र बावस्कर, पुंजाजी तायडे, पंचशीला भद्रे इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले