खांदा कॉलनी मध्ये पाणी टंचाई ; शिवसेनेची धडक कारवाई....

पनवेल / वार्ताहर :-  खांदा कॉलनी मधील जनतेला भेडसावत असलेल्या पाणी प्रश्नावर शिवसेना खांदा कॉलनी शहरप्रमुख  सदानंद शिर्के यांच्या नेतृत्वाखाली आज सिडको आणि महाराष्ट्र जीवनप्राधिकरणच्या कार्यालय धडक देऊन त्यांना योग्य ती समज देण्यात आली. 

यावेळी सिडकोचे सहाय्यक अभियंता राहुल  सरोदे आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सहाय्यक अभियंता अर्जुन गोळे यांना खांदा कॉलनी मधील पाणी प्रश्ना संदर्भात जाब विचारण्यात आला, त्याच बरोबर  एम जे पी च्या लाईनला लागलेले गळतीचे ग्रहण कधी दूर होणार असे अनेक प्रश्न शिवसेनेच्या शिष्टमंडळाने विचारून आपला संताप व्यक्त केला.

त्याचप्रमाणे खांदा कॉलनी मधील काही सोसायट्याना पाणी टंचाई असल्याने त्यांना टँकर द्वारे  आज पाणी पुरवठा शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आला. तसेच यावेळी आपण  लवकरात लवकर पाणी  प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन ही दोन्ही अधिकाऱ्यांन कडून घेण्यात आले. 

याप्रसंगी उपशहर प्रमुख  दत्तात्रेय महामुलकर, उपशहर प्रमुख संपत सुवर्णा, उपविधानसभा अधिकारी  सुशांत सावंत, उपशहर संघटक  प्रकाश वानखेडे, उपशहर संघटक संजीव गमरे, उपविभाग प्रमुख चंद्रगुप्त साळवी, उपविभाग संघटक  सुनिल महामुनी, उपकार्यालय प्रमुख नागम सर, शाखाप्रमुख मंगेश पवार, उपशाखाप्रमुख भास्कर साळवी, उपशाखाप्रमुख  गणेश साबळे, गट प्रमुख सुवरे  शाखा अधिकारी  सौरभ  महामुलकर, शाखा अधिकारी ऋषिकेश घुले, जेष्ठ शिवसैनिक  प्रकाश घाडीगावकर, प्रबोधन सोसायटीचे सदस्य  बाबासाहेब शिंदे,  मंगेश घुरण , विनायक मोरे, प्रदीप माने आदी शिवसैनिक व पदाधिकारी  उपस्थित होते.
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केला जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी यांचा विशेष सत्कार....
Image