मुस्लिम बांधवाने केले हिंदु बांधवाचे अंतिम संस्कार ; ऐक्याचे अनोखे प्रतिक

पनवेल, दि.12 (संजय कदम) ः एक मुस्लीम बांधव हिंदू बांधवाच्या मदतीला धावून जात अंतिम संस्कार हिंदू पद्धतीने करून एक अनोखे ऐक्याचे प्रतिक पनवेलकरांसाठी त्याने दाखवून दिले आहे.
पनवेल येथे राहणारे व खारघर येथे व्यवसाय करणारे सैय्यद खान लकी तवा हॉटेल हिरानंदानी खारघर  यांना व खारघर पोलीस ठाण्याचे वपोनि शत्रुघ्न माळी यांना माहिती मिळाली की, त्यांचे एक मित्र व त्याचे मेव्हुणे हे कोरोनाग्रस्त असुन ते हॉस्पीटलमध्ये आहेत व त्यांचे सासरे हे कोरोनामुळे मृत्यू पावले आहेत. अशावेळी अंत्यसंस्कार करणार कोण? हा प्रश्‍न निर्माण झाला असता सय्यद खान यांनी पुढे येवून अंत्यविधी मी करतो असे सांगून पुढील व्यवस्था त्यांनी त्यांचे मित्र वपोनि शत्रुघ्न माळी, विजय पानवाला, सुफी भाई आदींच्या साथीने करून अंत्यविधी पार पाडला. कोरोनाच्या काळामध्ये वेगवेगळे वाईट अनुभव येत असताना एक वेगळे उदाहरण किंवा ऐक्याचे एक अनोखे प्रतिक म्हणून खान भाईंकडे पाहिले जाणार आहे. 

फोटो ः अत्यंविधी
Comments