दारुसाठा जप्त
दारुसाठा जप्त

पनवेल, दि.१४ (वार्ताहर) ः बेकायदेशीररित्या देशी-विदेशी मद्यसाठा केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने छापा टाकून जवळपास ८४ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
उलवे येथे राहणारे टी.पाटील व देवकुमार पासवान यांनी सेक्टर -२३ या ठिकाणी बेकायदेशीररित्या दारु साठा केल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळताच त्यांनी एनआरआय पोलिसांच्या मदतीने त्या ठिकाणी छापा टाकून जवळपास ८४ हजाराचा दारुसाठा हस्तगत केला आहे. या गुन्ह्याची नोंद एनआरआय पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments