ट्रस्ट इंडियाने बनविलेल्या सॅनिटायझरला वाढती मागणी

पनवेल, दि.१० (वार्ताहर) ः पनवेलमधील व्यावसायिकाने ट्रस्ट इंडियाच्या माध्यमातून बनविलेल्या सॅनिटायझरला पनवेलसह रायगड, रत्नागिरी, नवी मुंबई, जालना, नगर, बोईसर, वापी, पुणे, नाशिक या ठिकाणी चांगलीच मागणी आहे.
सध्याच्या कोरोना काळाच्या पार्श्‍वभूमीवर सॅनिटायझरचा वापर जास्तीत जास्त करणे गरजेचे आहे. यासाठी आपल्या शरिराला उपयुक्त व विश्‍वासू असा सॅनिटायझर मिळणे नागरिकांसाठी गरजेचे बनले आहे. बाजारात अनेक  प्रकारचे वेगवेगळ्या कंपनीचे सॅनिटायझर वेगवेगळ्या दरामध्ये उपलब्ध आहेत. परंतु यांची विश्‍वासहर्ता ग्राहकांमध्ये कमी आहे. ट्रस्ट इंडियाच्या माध्यमातून बनविण्यात आलेल्या ट्रस्ट इंडिया ब्रॅण्ड सॅनिटायझरला मोठ्या प्रमाणात मागणी येत असून त्याचा वापर सुद्धा अनेक घरात, शासकीय कार्यालयात, कंपन्यांमध्ये होताना दिसत आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला हा ब्रॅण्ड नं.1 वर असल्याची माहिती ब्रॅण्डचे मालक दिलीप सिंघवी यांनी दिली आहे.
फोटो ः ट्रस्ट इंडियाचा ब्रॅण्ड
Comments