मा. उपमहापौर विक्रांत पाटील यांनी अशोक बाग येथील ड्रेनेज चा विषय सोडवून नागरिकांना दिला दिलासा.....

पनवेल :- अमरधाम रोड वरील अंकिता सोसायटी समोरील असलेला अशोक बाग परिसरात राहणारे रहिवाशी ड्रेनेजच्या विषया वरून त्रस्त होते. पनवेल नगर परिषद असलेल्या काळापासून काही ठिकाणी असलेली ही सांडपाण्याची व्यवस्था काळानुरूप बदल न केल्यामुळे कुचकामी ठरत आहे आणि त्याचा नाहक त्रास रहिवाशांना होत आहे.हीच परिस्थिती अशोकबाग मध्ये सुद्धा होती.छोटे ड्रेनेजचे चेंबर्स, आठ-आठ दिवसांनी तुंबणारे पाणी, सांडपाण्याची येणारी दुर्गंधी यासर्व गोष्टींच्या मुळे अशोक बाग मधील रहिवाशी त्रस्त झाले होते. याबाबत अनेक वेळा महानगरपालिकेत पाठपुरावा आणि पत्रव्यवहार करूनही त्यांचा प्रश्न सुटत नव्हता.शेवटी याबाबत ची तक्रार अशोक बागच्या रहिवाशांनी नगरसेवक तसेच माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांच्याकडे त्यांच्या जनसेवा कार्यालयात येऊन  केली.
अशोक बाग मधील रहिवाशांचा आरोग्यविषयक प्रश्न लक्षात घेता नगरसेवक विक्रांत पाटील यांनी सर्व त्वरित पाऊल उचलत कॉन्ट्रॅक्टरला बोलून घेतले व स्वखर्चाने ड्रेनेज बांधून दिले. आपल्या या प्रलंबित प्रश्नाचे निरसन करून दिलासा दिल्याबद्दल अशोक बाग मधील रहिवाशांनी नगरसेवक विक्रांत पाटील यांना धन्यवाद दिले.
Comments