मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या तर्फे गरजू रिक्षा चालकांना जीवनावश्यक वास्तूंचे वाटप...
पनवेल :- कोरोना काळात लॉक डाऊनमुळे सामान्य लोकांचे आर्थिक गणित बिघडत चालले आहे त्यात रोज कमाई करून खाणाऱ्या लोकांचे आणि रिक्षा चालकांची तर परिस्थिती आणखीनच बिकट आहे.या परिस्थितीचा गांभिर्याने विचार करत नगरसेवक "विक्रांत पाटील आणि कोठारी फौंडेशन" यांच्या वतीने प्रभाग क्र १८ मधील  गरजू रिक्षा चालकांना  जीवनावश्यक वस्तूंचे वाटप नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या जनसेवा कार्यालय जवळ  करण्यात आले.
महाराष्ट्र सरकार ने घोषणा करूनही रिक्षा चालकांना कोणतीही मदत अद्यापही मिळाली नाही पण नगरसेवक विक्रांत पाटील यांनी योग्यवेळी मदत केल्याबद्दल जमलेल्या सर्व रिक्षा चालकांनी आभार मानले.माझ्या प्रभागाच्या समस्या सोडवण्यासाठी मी नेहमीच तत्पर असतो पण सध्या लॉक डाऊनमुळे रिक्षा चालकांना धंदा ही मंदावला आहे काही लोक घरी बसले आहेत अशा माझ्या प्रभागातील रिक्षा चालकांना मदत करणे हे माझे परम कर्तव्य समझतो तसेच यापुढेही हे समाजकार्य असेच पुढे चालू राहील असे मनोगत नगरसेवक विक्रांत पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी भाजयुमो प्रिंट मीडिया सेल आणि कोठारी फौंडेशन चे विमलकुमार जैन, निलेश नाईक, निलेश देशमुख आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केला जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी यांचा विशेष सत्कार....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image