श्री साई नारायणबाबा यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन....

पनवेल, दि.२० (वार्ताहर) ः भगवती साई संस्थानचे संस्थापक आणि पनवेल येथील साई मंदिरचे निर्माणकर्ते जगदगुरु बाल योगी श्री साई नारायण बाबा यांचे आज दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
नारायण भगवती अय्यर उर्फ श्री साई नारायण बाबा (85) यांना त्यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे कोपरखैरणे येथील रिलायन्स हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. परंतु आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. ही बातमी पनवेलमध्ये पसरताच साई भक्तांवर दुःखाचा डोंगर कोसळला. अनेकांनी फोन करून संबंधित संस्थेशी संपर्क साधून माहिती घेतली. विविध सामाजिक उपक्रम, हजारो जणांचे मोफत विवाह, कोरोना काळात केलेले मोफत धान्य वाटप, विधवा माता भगिनींना केलेली मदत तसेच साई बाबांवर केलेले प्रवचन, अनेक निराधार गोरगरीबांना वेळोवेळी केलेली मदत यामुळे श्रीसाई नारायण बाबा पंचक्रोशीसह देशात, परदेशात प्रसिद्ध होते. देश-विदेशातून अनेक भक्त त्यांचे दर्शन, आशिर्वाद व प्रवचन ऐकण्यासाठी पनवेलमध्ये येत असत. 
गोरगरीबांसाठी त्यांनी अनेक सोहळे व कार्यक्रम राबविले होते. तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, डोळे तपासणी शिबीर आदी उपक्रम राबविले होते. गेल्या काही दिवसापासून त्यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे ते घरातच होते. नुकतेच त्यांना कोपरखैरणे येथील रिलायन्स हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. परंतु आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.



फोटो ः साई नारायण बाबा
Comments
Popular posts
महापालिकेच्यावतीने बावन बंगला परिसरातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई...
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या २८ व्या वर्धापनदिन दिनानिमित्त बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे होणार थाटात उद्घाटन...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल विधानसभा क्षेत्रात सामाजिक उपक्रमांची मालिका; 'बुके' नव्हे 'बुक' संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा...
Image
आईशा मदरसा तर्फे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न ...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभुदास भोईर यांच्यावतीने रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम ...
Image