प्लाझ्मा लॅबला परवानगी देण्याची शेकापची मागणी
पनवेल, दि.10 (वार्ताहर) ः पनवेल मध्ये प्लाझ्मा लॅबला परवानगी द्यावी अशी मागणी शेकापचे राजेश केणी यांनी केली आहे. या संदर्भाचे पत्र त्यांनी  जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
सध्या कोरोना महामारीने संपूर्ण देशात थैमान घातले आहे. रायगड जिल्ह्याचे प्रवेशव्दार असलेल्या पनवेल मध्येही त्यानें चांगलेच हातपाय पसरले आहे. कोरोना आजारावर सद्या प्लाझ्मा वरदान ठरत असून या प्लाझ्माची पनवेल मध्ये कमतरता भासत आहे. त्यातच पनवेल मध्ये प्लाझ्मा लॅब नसल्याने  प्लाझ्मा दान करणार्‍या दात्यांना प्लाझा देण्यासाठी मुंबई, नवी मुंबईत हेलपाटे मारावे लागत आहे.जर पनवेलच्या लॅब यांना प्लाझ्मा लॅब साठी परवानगी दिल्यास कोरोना रुग्णांना प्लाझ्मा उपलब्ध होवू शकेल  असे राजेश केणी यांचे म्हटलं आहे. 

जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या पत्रात राजेश केली यांनी, पनवेल मधील लॅब यांना प्लाझ्मा लॅबची परवानगी दिल्यास त्याचा फायदा  कोरोना रुग्णांना अधिक लाभदायक ठरणार असून पनवेल मध्ये कोरोना मुळे होणारे मृत्यूदर कमी होवू शकते असे म्हटले आहे.
Comments