विना परवाना ताडी विक्रीवर कारवाई...
विना परवाना ताडी विक्रीवर कारवाई

पनवेल दि.17 (वार्ताहर):विना परवाना ताडी विक्री करणाऱ्यांवर कळंबोली पोलिसांनी कारवाई केली आहे.
        
कळंबोली वसाहतीत विना परवाना झोपडपट्टी परिसरात ताडी विक्री केली जात असल्याची माहिती वपोनि संजय पाटील यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने येथील सिडको ऑफिस शेजारील नाल्याजवळील झोपडपट्टीलगत फूटपाथवर ताडी विक्री करणाऱ्या महिलेविरूद्ध कारवाई करून तिच्याकडील ताडी सदृष्ठ द्रव पदार्थ जप्त केला आहे.
Comments