पंचशील नगर रहिवाशी समाजिक संस्थेने ईद निमित्त ३५० गरजूंना अन्नदान व शिरखुर्मा वाटप..

पनवेल / संजय कदम :- पंचशील नगर रहिवाशी समाजिक संस्थे मुस्लिम बांधवांच्या ईद सणा निमित्त २५ किलो चिकन भाजी व २५ किलो  भात शिजवून मोफत अन्नदान वाटप करण्यात आले हा वाटपाचा कार्यक्रम  पंचशील नगर, आदई तलाव झोपड्या, नवीन पनवेल सेक्टर ६ समोरील झोपड्या पनवेल बस स्थानक रेल्वे स्टेशन परिसरातील सुमारे ३५०, लोकांना अन्नदान वाटप करण्यात आले.
 याच बरोबर ईद दुसऱ्या दिवशी पनवेल, नवीन पनवेल, खांदेश्वर पोलीस ठाण्यातील कार्यरत पोलीस बांधवांना व पंचशील नगर येथे शिरखुर्मा वाटप करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अन्नदाते जूम्मंन भाई खान, यांनी चिकन व शिरखुर्मा दिला व अमोल परदेशी यांनी तांदूळाच पोते देऊन मदत केली
या अन्नदानाच्या कार्यातुन  गरीब गरजूना भुकेल्या ना एक वेळचे अन्न देता येईल यासाठी सर्वांनी जमेल तसे आपआपल्या परीने मदत करण्याचे आवाहन संस्थे अध्यक्ष शंकर वायदंडे यांनी केले आहे
ही सामाजिक बांधिलकी जपत पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शंकर वायदंडे, उपाध्यक्ष अशोक आखाडे, खजिनदार भानुदास वाघमारे, सचिव राहुल पोपलवार , सहसचिव विनोद खंडागळे, संघटक कैलास नेमाडे, सल्लागार वकील रामभाऊ कांबळे, कमिटी सदस्य अजय दुबे,अमेय इंगोले,रामदास खरात ,हेमा रोड्रिंक्स संतोष जाधव वल्ली महमद शेख ,संतोष ढोबळे, संजय धोत्रे, हरीचंद बनकर, शोभा गवई, विनोद तायडे, आदी सह  मेहनत घेणारे रहिवाशी  दीपक खरात,विनोद इंगोले, सुशांत पाटील, अंकुश पाखरे, बंडू गाडगे,सागर चव्हाण, अनिल खिलारे अमोल गाडगे जितू घाटविसावे, संजय कंठाळे,संजय तायडे, जूम्मंनभाई, संजीव ठाकूर , मनोज ठाकूर आमन तायडे अविनाश पराड, करन बोराडे, गोपाल उबाळे,उमेश पलमाटे,अनिल वानखेडे धीरज नाईक, रोहित पवार, संतोष पाल, अमोल डाके,रोहित चव्हाण आदींन बरोबर महिला भगिनी पल्लवी आखाडे, रुपाली खंडागळे, अक्षदा कदम,सरस्वती वाकुडे, विजय मला कुशबा, शांतावा मस्के, पवित्र खंडागळे, आरती कुशबा, निकीती वाकुडे, आदीनी मेहनत घेतली
Comments