नोकरानेच केली 20 लाख रूपये किंमतीच्या दागिन्यांची चोरी


पनवेल / दि.17 (संजय कदम): नोकरानेच 20 लाख 19 हजार 240 रूपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना नवीन पनवेल परिसरात घडली आहे.
          
नवीन पनवेल से.-1एस येथे रत्नमणी ज्वेलर्स नावाचे दुकान असून या दुकानात मार्च 2021 पासून हिरालाल कुमावत हा सेल्समन म्हणून काम करीत होता. त्याने संधी साधून दुकानातील 20 लाख 19 हजार 240 रूपयांच्या सोन्याचे दागिने चोरून नेल्याने याबाबतची तक्रार अमित धर्मावत यांनी खांदेश्वर पोलिस ठाण्यात केली असून याबाबत अधिक शोध पोलिस करीत आहेत.
Comments