बेकायदेशीररित्या मद्यविक्री करणाऱ्यांवर कामोठे पोलिसांची कारवाई....

पनवेल दि.१८ (वार्ताहर)- सध्या देशभरात कोरोना या संसर्गजन्य आजाराची मोठ्या प्रमाणात लागण झाली असल्याने महाराष्ट्रात संचारबंदी, लॉकडाऊन असतानाही बेकायदेशीररित्या विदेशी मद्यसाठा करून त्याची विक्री करणाऱ्या एका इसमास कामोठे पोलिसांनी अटक केली आहे.
              
कामोठे वसाहतीमधील से.-35, मेघना वाईन शॉपच्या बाजूला भिंतीलगत ब्लू हेवन बिल्डींग येथे बेकायदेशीररित्या विदेशी मद्य विक्री कऱण्यात येत असल्याची माहिती कामोठे पोलिसांना मिळताच विशेष पथकाने त्याठिकाणी छापा टाकून भावेश कन्हैय्या सचदेव (वय-25) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून विदेशी मद्यसाठा व बियरच्या बाटल्या असा मिळून जवळपास 6225 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे व त्याच्याविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा सन 1949चे कलम 65 (ई) सह भादंवि कलम 188, 269, 270 प्रमाणे कारवाई केली आहे.
Comments