दोन मोटार सायकलची चोरी...
दोन मोटार सायकलची चोरी

पनवेल, दि.६ (संजय कदम) ः गेल्या 24 तासात पनवेल परिसरातून दोन मोटार सायकली चोरीस गेल्याने वाहन चालकांमध्ये भितीयुक्त वातावरण आहे.
बिंदू बहिरा यांच्या नावावर असलेली 25 हजार रुपये किंमतीची यामहा फसिनो मोटार सायकल क्र.एमएच-46-एएस-1146 ही हरिओम कट्टा हॉटेल उरण नाका, एमएसईबी ऑफिसच्या बाजूला पनवेल येथे उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी सदर गाडी चोरुन नेली आहे. तर दुसर्‍या घटनेत अनिल कुडपाने यांनी त्यांची 10 हजार रुपये किंमतीची अ‍ॅक्टीव्हा मोटार सायकल क्र.एमएच-46-आर-7242 ओम नमःशिवाय बिल्डींगमधील रिलायन्स मॉलच्या समोर करंजाडे येथे उभी करून ठेवली असता चोरीस गेली आहे. गेल्या काही दिवसापासून पनवेल शहरात सायकल चोरीसह मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले असल्याने वाहन मालकांमध्ये भितीयुक्त वातावरण आहे.
Comments
Popular posts
महापालिकेच्यावतीने बावन बंगला परिसरातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई...
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या २८ व्या वर्धापनदिन दिनानिमित्त बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे होणार थाटात उद्घाटन...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल विधानसभा क्षेत्रात सामाजिक उपक्रमांची मालिका; 'बुके' नव्हे 'बुक' संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा...
Image
आईशा मदरसा तर्फे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न ...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभुदास भोईर यांच्यावतीने रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम ...
Image