पनवेल, दि.१७ (वार्ताहर) :- अॅक्सिस बँकेचे क्रेडीट कार्डची माहिती अवैधरित्या प्राप्त करून त्याद्वारे 27 हजार रुपये काढून घेवून एका इसमाची फसवणूक केल्याची घटना कामोठे वसाहतीमध्ये घडली आहे.
शरिन जे.मॅथ्यु (39 रा.कामोठे) यांचे अॅक्सिस बँकेचे क्रेडीट कार्ड संदर्भात अवैधरित्या माहिती अज्ञात आरोपींनी घेवून त्याद्वारे दोन वेळा त्यांच्या परवानगीशिवाय कार्डचा वापर करून जवळपास 27 हजार रुपये काढून घेतल्याने याबाबतची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.