कौंटुंबिक वादातून पती ने केली पत्नीची हत्या ..
कौंटुंबिक वादातून पती ने केली पत्नीची हत्या
 
पनवेल दि २४( संजय कदम): कौंटुंबिक वादातून शनिवारी सकाळी पतीने पत्नीच्या डोक्यात मासे कापण्याचा कोयता घालून निर्घृण हत्या केल्याची घटना पनवेल जवळील करंजाडे वसाहतीमध्ये घडली आहे.
 
करंजाडे वसाहतीमध्ये सेक्टर ४, प्लॉट नं २०, साई सत्यम सोसायटीमधील तिसर्‍या मजल्यावर राहणारे संतोष पाटील (वय ४१) व त्यांची पत्नी संध्या पाटील (वय ३९) यांच्यात आज सकाळी कौंटुंबिक वाद झाला. त्यातूनच रागाच्या भरात पती संतोष पाटील याने मासे कापण्यासाठी लागणारा कोयता आपल्या पत्नीच्या डोक्यात घालून तीची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अजयकुमार लांडगे व ठसे तज्ञ इतर पथक घटना स्थळी पोहचले. अधिक चौकशी प्रकरणी पोलिसांनी पती संतोष पाटील याला ताब्यात घेतले आहे. पाटील कुटूंबियांना १ मुलगा असल्याचे समजतेय, या घटनेमुळे परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. 
Comments