महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी संतोष आंबवणे ...

पनवेल, दि.12 (संजय कदम) ः महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशन नवी मुंबईच्या अध्यक्षपदी पनवेलमधील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संतोष आंबवणे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशनच्या कार्यालयामध्ये मावळते अध्यक्ष मधु पाटील यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून संतोष आंबवणे यांची नियुक्ती करून त्यांच्याकडे कार्यभार हस्तांतरण केला. महाराष्ट्र बिल्डर्स असोसिएशन कित्येक वर्षे कार्यान्वित आहे. येत्या काळात सिडको, महानगरपालिका, नैना व इतर क्षेत्रातील विकास कामांचे प्रश्‍न व शेतकर्‍यांचे प्रश्‍न अत्यंत तीव्रपणे मांडून ते सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच विकास कामांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जातील. त्याचप्रमाणे साडेबारा टक्के व साडेबावीस टक्के प्लॉट वाटपासंदर्भातील प्रश्‍न तसेच नैना क्षेत्रातील टी.पी. स्किमचे भूखंड वाटप व त्यासाठी आवश्यक सोयी सुविधा मिळविण्याकरिता गरज भासल्यास शासन दरबारी आंदोलनात्मक पावित्रा घेवून प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्‍वासन नवनिर्वाचित अध्यक्ष संतोष आंबवणे यांनी यावेळी दिले. हा सोहळा सर्वांना पाहता यावा म्हणून ऑनलाईनची व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्यक्ष कार्यालयात सचिव बाळासाहेब भोसले, खजिनदार लक्ष्मण साळुंखे, उपाध्यक्ष शंकर म्हात्रे, मा.अध्यक्ष तुकाराम दुधे, के.के.म्हात्रे व प्रकाश बाविस्कर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सचिव बाळासाहेब भोसले यांनी सर्वांचे आभार मानले.
फोटो ः नवनिर्वाचित अध्यक्ष संतोष आंबवणे यांचे अभिनंदन करताना इतर मान्यवर.
Comments