सिलेंडरने भरलेल्या ट्रकला आग
पनवेल : वार्ताहर :- पनवेल ओएनजीसी जवळ रविवारी (दि. 11) दुपारी घरगुती सिलेंडरने भरलेल्या ट्रकच्या ड्रायव्हर केबीनला आग लागली होती. सिडको अग्नीशमन व पनवेल महानगरपालिका अग्नीशमन दलाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी तत्काळ आग विझवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
घरगुती सिलेंडरने भरलेला शुभम ट्रान्स्पोर्ट कंपनीचा ट्रक (क्र. एमएच 04 एफजे 4277) वाहतूकीदरम्यान पनवेल ओएनजीसीजवळ आला तेव्हा ट्रकच्या ड्रायव्हर केबीनला अचानकपणे आग लागली. घटनास्थळी सिडको अग्नीशमन व पनवेल महानगरपालिका अग्नीशमन अधिकारी कर्मचारी यामध्ये फायरमन प्रफुल्ल पाटील (ड्रायव्हर ऑपरेटर), समीर म्हात्रे, लीडींग फायरमन उमाकांत पाटील, जे. के. पाटील, अभिजीत नावलगी, वाय. टी. शिंदे दाखल झाले. त्यांनी तत्काळ आग आटोक्यात आणल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.