पनवेल, दि.15 (वार्ताहर) ः सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाला घरातला एसी साफ करायचा आहे यासाठी घरात बोलावून त्यानंतर बेडरुमची कडी लावून त्याच्याशी अश्लिल चाळे केल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी सदर इसमास गजाआड केले आहे.
तालुक्यातील कोप्रोली येथे सुरक्षा रक्षकाचे काम करणार्या एका इसमाला त्या ठिकाणी राहणार्या रत्नेश दुबे या इसमाने मध्यरात्रीच्या सुमारास घरात बोलावून घरातला एसी साफ करायचा आहे असे खोटे बोलून त्याला बेडरुममध्ये बोलावून त्यानंतर बेडरुमचा दरवाजा लावून त्याच्यासमोर नग्न होवून त्याला बळजबरीने अंगाला तेल फासण्यास सांगून तसेच इतर मनात लज्जा उत्पन्न होईल असे प्रकार करण्यास त्याला सांगितल्याने त्याचप्रमाणे सुरक्षा रक्षकाने हे करण्यास नकार दिल्याने त्या सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ करून तुला मारुन टाकीन अशी धमकी दिल्याने त्याच्याविरुद्ध पनवेल तालुका पोलीस ठाण्यात भादवी कलम 377, 511, 504, 506, 115 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.