पनवेल :- विमल फाउंडेशन आणि तेरणा ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने सुकापूर येथील बालाजी सिंफोनी येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले.या शिबिरास येथील रहिवाशांनी मोलाचे सहकार्य करून रक्तदान केले.
समाजात रक्तदानाचे महत्व रुजविणे आणि समाजाला रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुसंगाने या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते .अशी प्रतिक्रिया विमल फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश भाऊ ढसाळ यांनी यावेळी व्यक्त केली.सदर कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते राजेश केणी ,किशोर पाटील,निखिल म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.या रक्तदान शिबिरात १०० पिशव्या रक्त संकलित करण्यात आले.सदर शिबीरास तेरणा हॉस्पिटल मधील डॉक्टर, नर्सेस यांचे अनमोल सहकार्य लाभले.