पेटीएम द्वारे व्यापार्‍यांची फसवणूक करणार्‍या दोघांना पनवेल गुन्हे शाखे कडून अटक

पनवेल, दि.14 (संजय कदम) ः पनवेल जवळील रोडपाली येथील रिलायन्स स्मार्ट पॉईंट मॉल येथून दोन अनोळखी इसमानी जेमिनी खाद्य तेलाचे व इतर साहित्य खरेदी करून एन.इ.ऐफ.टी.द्वारे पेमेंट करण्याचा बहाणा करून  ट्रानसेकशन चा खोटा संदेश दाखवून रिलायन्स मॉल ची फसवणूक केल्या बाबत कळंबोली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होताच पनवेल गुन्हे शाखा कक्ष 2 च्या पथकाने सदर आरोपींना अटक केली आहे.

सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान कक्ष 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांच्या नेतृत्वा खाली पोलीस उप निरीक्षक वैभव रोंगे पो ह अनिल पाटील यांनी घटनास्थळी चे सीसीटीव्ही फुटेज, ट्रान्झेक्शन चा मेसेज आलेले अकाउंट व इतर तांत्रिक बाबीचा तपास करून सदर गुन्हयातील आरोपी यासिन मोहंमद गुलाम राहिमान शेख वय 28 रा.ठी.डायमंड बिल्डिंग,रूम न.601,शिळफाटा,मुंब्रा व दिलीप भैरव गुप्ता वय -24 रा.ठी.नायरचाळ,खंडोबा मंदिर,महाराष्ट्र नगर,मानखुर्द,मुंबई यांना अटक करण्यात आली आहे.

सदर गुन्ह्याबाबत अपर पोलीस आयुक्त गुन्हे डॉ.शेखर पाटील, पोलीस उप आयुक्त गुन्हे प्रवीण पाटील यांनी आरोपीच्या गुन्हे करण्याच्या पद्धतीबाबत सखोल तपास करण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार सहा.पोलीस आयुक्त गुन्हे विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनखाली गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेल यांनी सदर आरोपीकडे सखोल तपास करता नमूद आरोपी हे वेगवेगळ्या किराणा दुकानात व मॉल मध्ये जाऊन सामान खरेदी करतात. त्याच वेळी ज्या अकाउंट मध्ये बॅलेन्स नसतो त्या अकाऊंटमध्ये नमूद दुकानातील पेटीएम स्कॅन करतात. स्कॅन केल्यानंतर अगोदर ट्रांजेक्शन झाल्या बाबतचा  मेसेज येतो. तोच मेसेज आरोपी संबंधित दुकान मालकास दाखवतात व घाई असल्याचे दाखवून तिथून पसार होतात. त्यानंतर काही वेळातच ट्रांजेक्शन फेल चा मेसेज संबंधितांना येतो. अशाप्रकारे अनेकांची फसवणूक केली आहे.  त्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता नमूद आरोपीनी खालील दोन गुन्ह्यांची कबुली दिली असून नमूद गुन्ह्यातील सम्पूर्ण माल हस्तगत करण्यात आला आहे. त्यामुळे कळंबोली परिसरातील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. सदर आरोपींना अटक करण्यामध्ये  पो.ह.अनिल पाटील, पो.ना.कानू, पो.ना.रुपेश पाटील, सचिन म्हात्रे, यांनी विशेष मेहनत घेतली होती.
Comments