पंचशील नगरला जंतूनाशक सॅनिटायझर फवारणी
पनवेल, दि.२९ (वार्ताहर) ः पंचशील नगर रहिवाशी सामाजिक समितीतर्फे नागरिकांच्या आरोग्य हिताच्या दृष्टीने पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्था नवीन पनवेलचा सामाजिक उपक्रम जंतूनाशक सॅनिटायझर फवारणी करण्याचे काम केले गेले. 
27 व 28 एप्रिल दोन दिवस पंचशील नगर झोपडपट्टी परिसर सॅनिटायझर फवारणी करून लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वपुर्ण काम केले आहे.
या जंतुनाशक फवारणीसाठी पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शंकर वायदंडे, उपाध्यक्ष अशोक आखाडे,सचिव राहुल पोपलवार,खजिनदार भानुदास वाघमारे, संघटक कैलास नेमाडे, आदी बरोबर अविनाश पराड व करण बोराडे यांनी विशेष मेहनत घेऊन ही फवारणी केली आहे यावेळी संस्थेचे सदस्य हेमा रोड्रिंक्स, संतोष ढोबळे, संजय धोत्रे, अजय दुबे,रामदास खरात व संतोष कंठाले यांचे सहकार्य लाभले.
Comments