जीवन ज्योत कॅन्सर रिलीफ अ‍ॅण्ड केअर ट्रस्टच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन...

पनवेल, दि.५ (वार्ताहर) ः  आजच्या या युगात रूग्णांना रक्ताची गरज भासली आहे, परंतु त्या प्रमाणात उपलब्धता नाही, जीवन ज्योत कॅन्सर रिलीफ अँड केअर ट्रस्टने त्यांचे कर्तव्य बजावण्यासाठी रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.
 या उदात्त कार्यात काम करण्यासाठी आणि आपल्या समाजातील सर्व गरजू लोकांना मदत करण्यासाठी आपण या मध्ये सामील होऊ शकता. आपणास हे उदात्त काम करण्याची संधी मिळत आहे. आपणास कळविण्यास आनंद होत आहे की पनवेल शहरात आपण मोफत औषध केंद्र सुरू केले असून याची माहिती गरजू लोकांना देऊन त्यांना या सेवेचा लाभ करून द्यावा. आपला सहभाग आमच्यासाठी लाख मोलाचा ठरेल.

सदर रक्तदान शिबीर पनवेल रेल्वे स्टेशन येथे मंगळवार, 6 एप्रिल 2021 रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वा. आयोजित करण्यात आले आहे.Comments