पनवेल परिसरातून दोन मोटार सायकलची चोरी

पनवेल, दि.३ (संजय कदम) ः पनवेल परिसरातील बेलपाडा खारघर व तळोजा खुटारी या परिसरातून दोन मोटार सायकली चोरीस गेल्याची घटना घडली आहे.
जयदीप दळवी रा.अनमोल दर्शन सोसायटी सेक्टर 3 बेलपाडा यांनी त्यांची 35 हजार रुपये किंमतीची काळ्या रंगाची होंडा कंपनीची सीबी शाईन मोटार सायकल क्र.एमएच-45-एक्स-8690 ही घराजवळील रस्त्यावर उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी सदर मोटार सायकल चोरुन नेल्याची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तर दुसर्‍या घटनेत सुनील म्हात्रे यांनी त्यांची बजाज पल्सर मोटार सायकल क्र.एमएच-46-बीडब्ल्यू-4135 जिची किंमत 50 हजार रुपये आहे. ही राहत्या घरासमोर खुटारी येथे उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली आहे. याबाबतची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments