घरफोडीत ६० हजाराचा माल लंपास..
घरफोडीत ६० हजाराचा माल केला लंपास

पनवेल / दि.२१ (संजय कदम) ः कळंबोली वसाहतीमध्ये अज्ञात चोरट्यांनी दोन ठिकाणी केलेल्या घरफोडीत जवळपास 60 हजार रुपये किंमतीचा माल लंपास केल्याची घटना घडली आहे.

कळंबोली वसाहतीमधील जनता मार्केट सेक्टर 4 येथील प्रतापसिंह राठोड व चुनीलाल चौधरी यांच्या दोन वेगवेगळ्या दुकानात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून गारमेटस्चे साहित्य व इतर जीवनावश्यक वस्तू असा मिळून जवळपास 60 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेल्याची तक्रार कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments