चालकानेच केला ७० हजार रुपयांचा अपहार


पनवेल, दि.15 (संजय कदम) ः चालक म्हणून काम करीत असताना वेगवेगळ्या दुकानात किराणा माल पोहोचविण्यासाठी पाठविला असताना माल पोहोचवून आलेली रक्कम 70,177 ही मालकाला न देता सदर रक्कम घेवून परस्पर पसार झाल्याची घटना घडल्याने तळोजा पोलीस ठाण्यात सदर इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करुणेश वर्मा (44) यांच्या गाडीवर काम करणारा सिराज अहमद शेख याला चित्ता कॅम्प मुंबई येथील वेगवेगळ्या दुकानात किराणा माल पोहोचविण्यासाठी पाठविण्यात आले होते. सदर माल पोहोचविल्यानंतर त्याच्याजवळ 70,177 अशी रोख रक्कम जमा झाली होती. परंतु ती मुळ मालकाला आणून न देता ती स्वतःकडे ठेवून त्यानंतर तो पसार झाल्याने याबाबतची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments