पनवेल दि.१४ : पनवेल परिसरातील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता ज्येष्ठ नागरिक सभागृह येथील तळमजल्यावर फिवर क्लिनिक सुरू करण्याची मागणी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे.
पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत लक्षणे दिसल्यास नागरिक तपासणीकरिता पालिकेच्या आरोग्य केंद्र व फिवर क्लिनिकला भेट देत आहेत. या केंद्रांवर मोठ्या संख्येने नागरिक आरोग्य तपासणीकरिता येत असल्याने त्याठिकाणी मोठ्याप्रमाणात गर्दी होताना दिसून येत आहे. जेष्ठ नागरिक सभागृह येथे तळमजल्यावर असणाऱ्या आरोग्य केंद्राला जागा अभावी कोळीवाडा येथील ग्रामीण रुग्णालय येथे हलविण्यात आलेले आहे. सद्यस्थितीत जेष्ठ नागरिक सभागृह येथील तळमजल्यावर जागा रिकामी असल्याकारणाने येथे नागरिकांसाठी फिवर क्लिनिक सुरु करण्यात यावे अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रीतम जनार्दन म्हात्रे यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ज्येष्ठ नागरिक सभागृह येथील तळमजल्यावर फिवर क्लिनक सुरू झाल्यास जेणेकरून इतर आरोग्य केंद्र व फिवर क्लिनिक वरील ताण कमी होईल.